‘आयपीएलसाठी कसोटी क्रिकेटचा अपमान केला’; माजी इंग्लिश क्रिकेटपटूने सुनावले खडेबोल 

virat

नवी दिल्ली : भारताचा इंग्लंड दौरा अकाली संपल्यामुळे बराच वाद निर्माण झाला. भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रद्द करण्याचा निर्णय कोरोनाचे संकट लक्षात घेऊन घेण्यात आला. टीम इंडियाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला.

यावरच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू पॉल न्यूमन यांनी मँचेस्टरमध्ये पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू, बीसीसीआय आणि आयपीएलवर निशाणा साधला आहे. टीम इंडियाचे फिजिओ फिजिओ योगेश परमार पाचव्या कसोटीपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले ज्यामुळे सामना होऊ शकला नाही.

याच पार्श्ववभूमीवर न्यूमन म्हणाले, ‘जर भारतातील बहुतेक खेळाडू दुबईला श्रीमंत टूर्नामेंट आयपीएलसाठी गेले नसते, तर दिवशी खेळ रद्द झाला नसता. कोणताही भारतीय खेळाडू ज्याच्याकडे आयपीएल करार आहे. तो कसोटी खेळण्याचा धोका घेत नाही कारण त्याला पॉझिटिव्ह येण्याची भीती आहे आणि जर तो पॉझिटिव्ह आढळला तर त्याला आणखी 10 दिवस इंग्लंडमध्ये राहावे लागेल आणि त्याला 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणे कठीण होईल. पण भारताने याशिवाय इतर मालिकांचा आदर केला नाही आणि चौथ्या कसोटीपूर्वी कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून कसोटी क्रिकेटचा आदर केला नाही.

त्यांनी यावेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर देखील निशाण साधला आहे. कोविडचा धोका होता तरी देखील लंडनमध्ये चौथ्या कसोटीच्या अगोदर रवी शास्त्री यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आयोजित केला. शास्त्री लंडनच्या एका हॉटेलमध्ये कर्णधार विराट कोहली आणि अनेक खेळाडू तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम सुरू केला, त्या कार्यक्रमात 150 हून अधिक लोक उपस्थित होते.’ या सर्व प्रकारावर त्यांनी भारतीय संघाला तसेच आयपीएल आणि बीसीसीआयला खडेबोल सुनावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या