शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार जमा करण्यासाठी माहिती जमविण्याच्या सूचना : राजीवकुमार

टीम महाराष्ट्र देशा – केंद्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केले की, पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देणार. त्या योजनेची डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मार्चअखेर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी बॅंकिंग यंत्रणा तयार आहे.

दोन हजार देताना नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायचे याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यांनी याबाबत शक्य लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संकलित करावी, अशा सूचना राज्यांना जारी करण्यात आल्या असल्याची माहिती निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी दिली आहे.

राजीवकुमार म्हणले, ‘आम्ही राज्यांना संदर्भात अगोदरच पत्र लिहिले आहे. या योजनेचा देशभरातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मार्चअखेर या 12 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये दिले जाणे अपेक्षित आहे. ही रक्कम केंद्र सरकार उपलब्ध करणार आहे. मात्र शेतकऱ्यांची माहिती राज्यांना संकलित करून उपलब्ध द्यावी लागणार आहे.’