EVM च्या जागी पुन्हा येणार मतपत्रिका?; या भाजप नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधान

EVM

आगामी काळात देशभरात होणाऱ्या निवडणुका इव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. दिल्लीत सध्या सुरु असणाऱ्या कॉंग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशनात मतपत्रिकेद्वार मतदान घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दरम्यान, आता भाजपनेही मतपत्रिकेद्वारे निवडणुकांना अनुकुलता दर्शवायला सुरुवात केली असल्याच दिसत आहे.

भाजपचे महासचिव राम माधव यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना मतपत्रिकेद्वारे निवडणुकीला अनुकुलता दाखवली आहे. ते म्हणाले कि ‘सर्वप्रथम इव्हीएमद्वारे निवडणुका घेण्याचा निर्णय हा सर्वानुमते घेण्यात आल्याच कॉंग्रेसने लक्षात ठेवाव, आता बहुतांश पक्षांकडून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास सहमती दर्शवली जात आहे. त्यामुळे सर्वांचा विचार करता आगामी काळात आम्हीसुद्धा याबाबत विचार करू शकतो.Loading…
Loading...