fbpx

‘शेतकरी होऊन पाचशे रुपये घेण्यापेक्षा साधू होऊन पाच हजार घेईन’

टीम महाराष्ट्र देशा- काल मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते यांनी देखील टीकास्त्र सोडले.भाजपा सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे बेरोजगारी निर्माण झाली आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था तर इतकी वाईट आहे की, सरकारच आता शेतकऱ्यांकडे पैसे मागते असं पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार पुढे म्हणाले ,भाजपा सरकारने शेतकऱ्यांना पाचशे रुपयांची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी साधूंना पाच हजारांची मागणी योगींनी केली आहे. ‘महाराष्ट्रातले तरुण आता मला म्हणतात की, शेतकरी होऊन पाचशे रुपये घेण्यापेक्षा साधू होऊन पाच हजार घेईन,’ असे सांगून शेतकऱ्यांची अवस्थाही अत्यंत वाईट असल्याची टीका पवार यांनी केली.

कमळाबाई वाकली पाहिजे, आणि धनुष्यबाण मोडले पाहिजे असेही त्यांच्या खास शैलीत ते म्हणाले. महादेव जानकर आता दौंडमध्ये का येत नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला. जानकर आता कार्यकर्त्यांनाच म्हणतात की, जमिनी विका आणि पक्ष वाढवा. धनगर आरक्षणाची मागणी केली तर देऊ म्हणतात. जानकरांना आता मंत्रिपदाची ऊब लागल्यामुळे त्यांना आरक्षणचा विसर पडलाय, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.