सायकल वर स्टंटबाजी करण्यापेक्षा प्रशासकांनी नगरसेवकांना सोबत घेऊन पाहणी करावी – नासीर सिद्धिकी 

औरंगाबाद : सायकल वर संपूर्ण शहरातील मुलभूत सुविधांची पाहणी करण्याचा दावा करत प्रशासकांनी स्टंटबाजी केली. वार्डातील गंभीर समस्यांची जान नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात माहित असून त्यावर प्रशासक काम करीत नसून शहरातील नागरिकांची असे स्टंट करून दिशा भूल करीत आहे. त्यांना पाहणी करण्याची एवढीच हौस असेल तर त्यांनी सर्व वार्डातील नगरसेवकांना सोबत घेऊन पाहणी करावी. त्यामुळे वार्डातील समस्या लवकर मार्गी लागेल. असे नासीर सिद्धिकी यांनी ‘महाराष्ट्र देशा’ शी बोलतांना सांगितले.

शहरवासी सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहेत. त्यात मुख्यत्त्वे पाण्याची समस्या तर मागील काही वर्षांपासून जटील होत आहे. शनिवारी मुलभूत समस्यांची पाहणी करत असताना, प्रशासक नेमके कोणत्या पाण्याच्या टाकीला भेटीला गेले, हा सवाल अनुत्तरीत आहे. कचरा प्रश्न मार्गी लावण्याचा दावा करीत असलेल्या मनपात नुकतेच एमआयएमच्या माजी नगरसेवकाने आंदोलन करीत कार्यालयाच्या गेटलाच टाळे ठोकले होते. त्या भागाचीही पाहणी करण्याची तसदी मनपा आयुक्तांनी घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने सायकल ट्रॅकचे कौतुक केल्यामुळे प्रशासकांना सायकलवर फिरण्याची उपरती झाली असल्याचीही चर्चा मनपा वर्तुळात दबक्या आवाजात सकाळपासूनच सुरु होती. आज घडीला सायकल ट्रॅक समोर हातगाडी, फेरीवाले, कार तसेच दुचाकी लावून क्रांती चौक ते स्टेशन रस्त्याला उभे असतात. पाहणीत या सर्वांकडे प्रशासकांनी डोळेझाक केली का? असा सवाल त्या रस्त्यावरून जाणारे वाहनधारक करीत आहे. मात्र, आज पाहणीत प्रशासकांनी नेमके काय पहिले? हा सवाल जरी गुलदस्त्यात असला तरी एकाच सायकल स्वारीच्या फेरीत पाहणी होत असल्याचा चमत्कार त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या