आत्मदहन करण्याऐवजी लोकशाही मार्गाने निवडणुकीत सरकारचे दहन करा ! – धनंजय मुंडे

dhananjay munde and vidhanbhavan

मुंबई : रिपब्लिकन बांधवांनी आत्मदहन करण्याऐवजी लोकशाही मार्गाने निवडणुकीत सरकारचे दहन करावे.असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. रिपब्लिकन सेना या संघटनेच्या कार्यकर्त्याने कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणातील आरोपी संभाजी भिडे गुरुजी यांना अटक करण्यात यावी. या मागणीसाठी मंत्रालयाच्या गेटसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

यावर धनंजय मुंडे म्हणाले, रिपब्लिकन बांधवांनी आत्मदहन करण्याऐवजी लोकशाही मार्गाने निवडणुकीत सरकारचे दहन करावे. भीमा कोरेगावच्या घटनेमागच्या सुत्रधारांवर कारवाई होत नसल्याने बहुजन समाज अस्वस्थ आहे. या दंगलीसंदर्भात शासनाची भूमिका संशयास्पद आहे. समाजातल्या दुर्बल घटकांवर अन्याय होत असल्याची भावना तीव्र आहे.

मंत्रालयासमोर आत्मदहनाच्या प्रयत्नाचा पुन्हा एकदा प्रकार घडला आहे. संभाजी भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गणेश पवार असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो रिब्लिकन सेनेचा कार्यकर्ता आहे. पोलिसांनी आत्मदहनाचा प्रयत्न करताना त्याला ताब्यात घेतले आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकबोटे यांना अटक झाली होती. त्यांना जामिनही मिळाला आहे. मात्र, संभाजी भिडे गुरुजी यांना अद्याप अटक झालेली नाही.