Share

Gold | आता दिवाळीत ‘या’ सोन्यात करा गुंतवणूक आणि मिळवा भरपूर फायदा

मुंबई : ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप सण आहेत. आताच नवरात्र झाले आणि आता काही दिवसांनीच दिवाळी येणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना सणसुदीचा आहे, असं म्हणायला काही हरकत नाहीय. या सणांना आपण खूप उत्साही असतो. काहीजण या शुभ मुहूर्तावर अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. तर त्यातील सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. जर तुम्हीही सोन्यामध्ये गुंतवणूक करत असाल, तर यापुढे करू नका. कारण सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करू शकता.

तुम्ही गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमधूनही सोन्याची खरेदी विक्री करू शकता. गोल्ड लिंक्ड म्यूचुअल फंड आहे ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता.तसेच तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन पोर्टलवरून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. या डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला शेअर बाजारात जसे सोन्याचे दर वाढतात तसे तुम्हाला रिटर्न मिळतात.

तसेच, फिजिकल गोल्डमधील (दुकानामध्ये जाऊन खरेदी केललं सोनं) अडचणी फिजिकल गोल्ड खरेदी केल्यावर तुम्हाला त्यासाठी मेकिंग चार्ज द्यावे लागतात. मग तुम्ही ज्वेलरी घ्या किंवा नाणं घ्या दोन्हीवर मेकिंग चार्जेस लागतात.जर तुम्ही गोल्ड कॉइन, बुलेट किंवा बिस्कीट खरेदी केलं तर 8 ते 16 टक्के मेकिंग चार्जेस लागतात. कायद्यानुसार दागिन्यांवर ते लावणं चुकीचं आहे पण तरीही ते लावले जातात.

त्याचबरोबर आपण सर्वजण दुकानातून सोनं खरेदी करतो आणि आपल्या लोकरमध्ये किंवा घरातील कपाटात ठेवतो. परंतू ते तिथेही सुरक्षित नसेतं. कारण आजकाल चोर बॅंकेतही दरोडा टाकायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थित तुम्ही डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप सण आहेत. आताच नवरात्र झाले आणि आता काही दिवसांनीच दिवाळी येणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना …

पुढे वाचा

Finance Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now