व्हिआयपी कल्चर संपवण्याऐवजी मुख्यमंत्री चोरुन- चोरुन व्हीआयपी कल्चर आणत आहेत – नवाब मलिक

devendra fadnvis and nawab malik

मुंबई   – नरेंद्र मोदी देशामध्ये ढिंडोरा पिटत आहेत की देशामध्ये व्हिआयपी कल्चर संपलं आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री आपल्याच कार्यकर्त्यांना चोरुन-चोरुन मंत्रीपदाचा दर्जा देत व्हीआयपी कल्चर आणत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केला.

देशातील व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी मंत्र्यांचा लाल दिवा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लालदिव्याशिवाय मंत्री फिरत आहेत आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देत आहेत. सिध्दीविनायक मंदिराच्या अध्यक्षांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष हावरे यांनाही मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला.भाजपचे हे वेगळं चारित्र्य आहे.

व्हिआयपी कल्चर संपवण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना चोरुन चोरुन आपल्या लोकांना व्हीआयपी बनवत आहे. यावरुन देशाच्या जनतेसमोर भाजपचा असली चेहरा समोर आला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

हिंमत असेल तर उध्दव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी न चढण्याचे आदेश दयावेत – नवाब मलिक

 

राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाला राष्ट्रवादीचा विरोध नाही – मलिक