कोल्हापूर जिल्ह्यात २,२०० हून अधिक सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना

कोल्हापूर : प्रचंड उत्साही वातावरणात आज कोल्हापूरात घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन झाले. धर्मादाय न्यास नोंदणी कार्यालयात कोल्हापूर महापालिका हद्दीत ९२२ गणेश मंडळाची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यात २,२०० हून अधिक सार्वजनिक ठिकाणी गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

आज सकाळपासूनच शाहूपूरी, गंगावेश, बापट कॅम्प येथे गणेशमूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी सहकुटुंब गर्दी केली. सायंकाळी ही गर्दी सार्वजनिक मंडळानी केली. याच वेळी पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे गणेशमूर्तींना प्लास्टीक कागदाने झाकण्यासाठी गडबड, धावपळ झाली. रात्री उशिरापर्यंत झांज पथकाच्या निनादात गणेशमूर्ती मंडपात विराजमान झाल्या.