एस टी बस स्थनकावर आता मिनी थिएटर्स !

टीम महाराष्ट्र देशा : एस टी महामंडळाच्या इतिहासात बस वेळेवर येणे हे फारच दुर्मिळ आहे. पण आता प्रवाश्यांनी बस उशीरा आली म्हणून काळजी करू नये कारण राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील तब्बल ६० बसस्थानकांवर प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी मिनी थिएटर्सची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या राज्यांत साडेसाहाशेच्या वर बस स्थानक आहेत तसेच त्यामधील बऱ्याच बस स्थानकांचे नुतीनिकरण सुरु आहे. यानुसारच बसस्थानकावर मिनी थिएटरची संकल्पना पुढे आली अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

चंद्रपूर येथे एमडीआर मॉल अॅन्ड मिराज सिनेमाचे उद्घाटन वेळी सुधीर मुनगंटीवार आले होते. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत चर्चा करून एसटी बस स्थानकांवर मिनी थिएटर्स बाबतचा निर्णय घेण्यात आला.राज्यातील ६० बसस्थानकांवर मिनी थियेटर्स बनविण्यात येणार आहेत. या माध्यमातून त्या बसस्थानकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोनातून या थिएटरमध्ये मार्गदर्शन घेता येईल.

यावेळी कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आदी मंडळी उपस्थित होते