fbpx

टेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का

पुणे : महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने मुलींच्या १७ वर्षाखालील एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेनिसमध्ये सुवर्णपदकाच्या संधी निर्माण केल्या. मात्र तिची सहकारी गार्गी पवार हिला मात्र उपांत्य फेरीत पराभवास सामोरे जावे लागले.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सेंटर कोर्टवर झालेल्या उत्कंठापूर्ण लढतीत प्रेरणा हिने आंध्रप्रदेशच्या लक्ष्मी रेड्डी हिचे आव्हान संपुष्टात आणले. चुरशीने झालेला हा सामना प्रेरणा हिने ७-५, ६-४ असा जिंकला. प्रेरणा हिने क्रॉसकोर्ट फटक्यांबरोबरच बॅकहँड फटक्यांचाही सुरेख खेळ केला. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला.

प्रेरणा हिला सुवर्णपदकासाठी गुजरातच्या प्रियांशी भंडारी हिच्याशी खेळावे लागणार आहे. प्रियांशी हिने एकतर्फी लढतीत गार्गी हिचा ६-२, ६-२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. स्पर्धेत ३९ व्या मिनिटाला विनय कोकंदामुरी याने महाराष्ट्राचे खाते उघडले. या गोलच्या आधारे त्यांनी मध्यंतरापर्यंत आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात पंजाबच्या खेळाडूंनी धारदार आक्रमणास अचूकतेची जोड देत विजयश्री खेचून आणली. ४९ व्या मिनिटाला त्यांच्या एस.लोतजेम याने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ ६२ व्या मिनिटाला त्यांच्या एस.तरुण याने हेडिंगच्या साहाय्याने सुरेख गोल नोंदविला आणि संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या भरपाई वेळेत पंजाबच्या मंगमिंलुम सिंग्सोन याने संघाचा तिसरा गोल केला.

मुलींच्या १७ वर्षाखालील उपांत्य फेरीत ओडिशा संघाने मणीपूरचा २-१ असा पराभव केला. साxमन्याच्या चौथ्या मिनिटाला दीपाकुमारी हिने ओडिशाचे खाते उघडले. तथापि मणीपूरच्या लैश्राम हिने ४९ व्या मिनिटाला गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. बराच वेळ ही बरोबरी कायम होती. अखेर ८९ व्या मिनिटाला सरिताकुमारी हिने ओडिशाचा विजयी गोल केला.

2 Comments

Click here to post a comment