महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

पाच महिन्यांनंतर झाला अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

उल्हासनगर : रिपब्लिकन पक्षाचे गटनेते भगवान भालेराव यांना उद्देशून जातीयवादी वक्तव्य केल्यामुऴे महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर काल(१६ नोव्हेंबर) रात्री उशीरा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता, रिपाइं, भारिप, पीआरपी, काँग्रेस पक्ष गटनेत्यांचे कॅबिन सीलबंद केले. पूर्व सूचना न देता केबिन बंद केल्यामुळे रिपाइं गटनेते भालेराव यांनी आयुक्त निंबाळकर यांना जाब विचारला. यावेळी दोघामध्ये शाब्दिक वाद होऊन निंबाळकर यांनी भालेराव यांच्यावर जातीवाचक टीका केली. रिपाइंचे शहराध्यक्ष व पक्ष गटनेते भगवान भालेराव यांच्यासह अनेकांनी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्यासह मध्यवर्ती पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन कारवाईचे निवेदन दिले. अखेर पाच महिन्यांनंतर कल्याण सत्र विशेष न्यायालयाने महापालिका आयुक्त निंबाळकर यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.

You might also like
Comments
Loading...