आमदार नरेंद्र पवार यांनी केली एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसह पत्रीपुलाची पाहणी

· नवीन पत्रीपुलाच्या कामाचा आढावा घेत तातडीने काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

टीम महाराष्ट्र देशा : कल्याण डोंबिवली शहरातील वाहतुकीचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात होत आहे. मात्र गेली अनेक दिवस कामामध्ये प्रगती न जाणवल्याने आमदार नरेंद्र पवार यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसह थेट पत्रीपुलावर जाऊन पाहणी करत कामाचा आढावा घेतला. रेल्वे विभागाकडून काही तांत्रिक परवानग्या मिळण्यास विलंब होत असल्याने पूल पूर्ण होण्यास अजून एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कोणत्याही ठिकाणी अडचण येत असेल तर कधीही आपल्याशी संपर्क करा मी स्वतः व खासदार कपिल पाटील शक्य ती सर्व मदत करू मात्र पूल तातडीने पूर्ण करून कल्याणची वाहतूक समस्या सुटली पाहिजे यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

bagdure

१८ नोव्हेंबर २०१८ रोजी सहा तासांचा ब्लॉक घेऊन वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेला ब्रिटिशकालीन जुना पत्री पुल पाडण्यात आला. त्यानंतर या जागेवर नवा पुल अत्यंत जलदपणे उभारू असे आश्वासन एमएसआरडीसीने दिले होते. मात्र आता जवळपास महिनाभर उलटुन गेल्यानंतरही काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांच्या निदर्शनास आले. जुना पुल पाडल्याने वाहतुकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असणाऱ्या नव्या पुलावर आल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना करावा लागत आहे. वारंवार विचारणा करूनही अधिकारी वर्ग सविस्तर माहिती देत नसल्याने आमदार नरेंद्र पवार यांनी स्वतःच थेट पत्रीपुलाच्या बांधकाम परिसराला भेट देऊन सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान सबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करत प्रत्यक्ष कामाची स्थिती जाणून घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी रेल्वेकडून काही तांत्रिक परवानगी लवकर मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली. यावर आमदार नरेंद्र पवार यांनी स्वतः व खासदार कपिल पाटील यांच्यासह सर्व परवानग्या मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे, कंत्राटदार दीपक मंगल, सल्लागार एल. एन. मालविया आदी अधिकारी उपस्थित होते

You might also like
Comments
Loading...