अत्यांधुनिक बदलांसह आयएनएस करंज पुन्हा नौदलात

आशुतोष मसगौंडे : भारताचे नौदल प्रमुख एडमिरल सुनिल लांबा यांच्या ऊपस्थीतीत माझगाव डाँक येथे भारतीय नौदलात स्कँर्पियन श्रेणीतील तीसरी पाणबुडी आयएनएस करंजचा समावेश करण्यात आला.

स्कँर्पियन श्रेणीतील आयएनएस कलवरी व आयएनएस खांदेरी पाणबुडी बरोबर करंजचा समावेश झाल्याने भारताची नौदल ताकद वाढणार आहे.हिंदी महासागरात चीनचा आणि अरबी समुद्र क्षेत्रात पाकिस्तानचा वाढता प्रभाव रोखन्यासाठी करंज पाणबुडी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावनार आहे.करंज पाणबुडीच्या काही विशेष क्षमतेमुळे चीन व पाकिस्तानला करंज पाणबुडी रडारवर घेणे शक्य होणार नाही.

करंज पाणबुडीचा प्रथम १९६९ मधे भारतीय नौदलात समावेश करण्यात आला होता.त्यानंतर चौतीस वर्षांच्या सेवेनंतर करंजला २००३ मधे नौदलातून निवृत्त करण्यात आले होते.आज पुन्हा करंज पाणबुडीला अत्यांधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून अनेक बदलांसह नौदलात समाविष्ट करण्यात आले.
मेक इन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत माझगाव डॉक येथे निर्मीत केलेल्या करंज पाणबुडीचे वजन १ हजार ५६५ टन इतके आहे तर लांबी ६७.५ मिटर व ऊंची १२.३ फूट आहे.तसेच आपत्कालिन परीस्थीतीत आँक्सीजन निर्मीती करण्याची कारंज पाणबुडीची क्षमता याची खासियत आहे.