‘आयएनएस कलवरी’ पाणबुडीची वैशिष्ट्ये

मुंबई : भारतीय नौदलाची ‘आयएनएस कलवरी’ ही पहिली स्वदेशी पाणबुडी आजपासून नौदलात दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस कलवरी’ चे जलावतरण करण्यात आले आहे. आयएनएस कलवरी ही स्वदेशी असून स्कॉर्पियन दर्जाची पाणबुडी आहे.

या पाणबुडीचे वजन 1,564 टन इतके आहे. याची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने केली असून ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे.१९६७ साली पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी ही नौदलात दाखल झाली होती. या पाणबुडीचे कमांडिंग ऑफिसर केएस सुब्रमण्यम हे असून ही पाणबुडी ३१ मे १९९६ साली निवृत्त करण्यात आली होती.

या पाणबुडीत शत्रुला तात्काळ उत्तर देण्याची क्षमता आहे. हिचा आकार हायड्रो-डायनामिक आहे. यामध्ये घातक हत्याराचाही समावेश करण्यात आला आहे. या पाणबुडीची खोल समुद्रात 120 दिवस चाचणी घेण्यात आली आहे. यात 300 किमी दूर मारा करण्याची क्षमता आहे.

You might also like
Comments
Loading...