‘आयएनएस कलवरी’ पाणबुडी नौदलात दाखल

पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलावतरण

मुंबई : भारतीय नौदलाची ‘आयएनएस कलवरी’ ही पहिली स्वदेशी पाणबुडी आजपासून दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस कलवरी’ चे जलावतरण करण्यात आले आहे.

यावेळी या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती. कलवरी पाणबुडीची निर्मिती माझगाव गोदीत करण्यात आली आहे.

INS Kalvari:फ्रान्सच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकारला आहे. ऑक्टोबर २००५ मध्ये फ्रान्सच्या पाणबुडी बांधणी कंपनी डीसीएनएस (नेव्हल ग्रुप) बरोबर हा करार झाला होता. त्यानुसार या प्रकल्पाअंतर्गत ६ पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

INS Kalvari:अशा प्रकारच्या सहा पाणबुड्या लवकरच भारतीय नौदलात दाखल होणार आहेत. ही पाणबुडी डिझेल-इलेक्ट्रिक या तंत्रावर काम काम करते.

INS Kalvari:

You might also like
Comments
Loading...