पालघर ईव्हीएम मशीनप्रकरणाची सखोल चौकशी करा – नवाब मलिक

EVM

मुंबई   – पालघर लोकसभा निवडणूकीमध्ये खाजगी गाडीमध्ये ईव्हीएम मशीन मिळाले याचा अर्थ काहीतरी गडबड झालेली असून याची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

पालघर लोकसभा निवडणूकीमध्ये मतदान प्रक्रियेनंतर एका खाजगी गाडीने ईव्हीएम मशीन नेण्याचा प्रकार समोर आल्यानंतर यामध्ये काहीतरी पाणी मुरते आहे असा संशय नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

खाजगी गाडीतून ईव्हीएम मशीन नेण्याबाबत जिल्हाधिकारी कितीही खुलासा करु देत परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सरकारी गाडीऐवजी एका खाजगी गाडीचा वापर केला आहे. ईव्हीएम खाजगी गाडीतून नेण्याचा प्रकार झाल्याने यातूनच काहीतरी गडबड झाली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.