औरंगाबादेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिनव आंदोलन

औरंगाबाद : औरंगाबादकरांना आज एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. शेतकऱ्यांना वीजमाफी करावी, इंधनाचे दर कमी करावेत, महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या का वाढत आहे याचा खुलासा करावा या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय जनक्रांती सेनेचे वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री असा गणवेश घालून आंदोलकांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलक म्हणाले, इतर सर्व राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सर्व व्यवहार सुरू आहेत. परंतू महाराष्ट्रातच कोरोनाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरण्याचे काम होत आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या संघटनांची सरकार गळचेपी करीत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. जनजीवन पुर्ण विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत महावितरण जनतेला आणि शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासंदर्भात दबाव टाकत आहे. त्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ठाकरे सरकारला जनतेची चिंता वाटत असेल तर त्यांनी इंधनावर लावलेला कर मागे घ्यावा.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातील सर्व महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे. महामंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या नसल्यामुळे मागासवर्गीय तरुण उद्योजकांना अर्थसाह्य मिळत नाही. एक प्रकारे ठाकरे सरकार मागासवर्गीय उद्योजकांना संपवण्याचा कट करीत आहे काय अशी शंका येते तरी सरकारने महामंडळाच्या नियुक्त्या करून महामंडळाला अनुदान देण्यात यावे या व इतर मागण्यासाठी आणि आघाडी सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रीय जन क्रांती सेनेच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन विभागीय आयुक्तालयासमोर करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध म्हणून प्रतिकात्मक मी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, मी महसूलमंत्री या असे लिहिलेला गणवेश परिधान केला होता.

महत्त्वाच्या बातम्या : 

IMP