रणबीर-आलियाची कुटुंबासोबत डिनर डेट

 टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि त्याचं कारण म्हणजे बॉक्स ऑफीसवर ‘संजू’ हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे ‘संजू’ या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड तोडले आहे. दुसरीकडे रणबीर त्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यातून मिळणारा फावला वेळ रणबीर आलियासोबत व्यतित करताना दिसतो.

शुक्रवारी रात्री रणबीरला आलिया भट्टच्या घरी पाहिलं गेलं. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर आणि आलिया एकत्र काम करत आहेत. शुक्रवारी रात्री रणबीर आलियाच्या घरी डिनर डेटला गेला होता. तिच्या घराबाहेरून काढलेले फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये आलिया आणि रणबीर एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. काही फोटोंमध्ये आलियाचे वडील महेश भट्टसुद्धा दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी आलिया रणबीरच्या कुटुंबीयांसोबत डिनर डेटला गेली होती. बी-टाऊनमध्ये सध्या या जोडीचीच चर्चा पाहायला मिळते. सोनम कपूरच्या लग्नात जेव्हा आलिया आणि रणबीरला एकत्र पाहिलं गेलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यानंतर ‘राझी’च्या स्क्रिनिंगलाही रणबीर आलिया एकत्र दिसले. या दोघांबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात असतानाच रणबीरने एका मुलाखतीत त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती.