मराठा आरक्षण : ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांना फासलं काळं

सोलापूर : मराठा आरक्षणासंदर्भात सोलापूरात शुक्रवारी (4 मे) मागासवर्गीय आयोगासमोर जनसुनावणी प्रारंभ झाला. यावेळी समितीपुढे निवेदन देण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी शंकरराव लिंगे तसेच अॅड. राजेंद्र दीक्षित यांच्या तोंडाला काळे फासून कपडे फाडण्यात आले. यावेळी ओबीसी कार्यकर्ते शंकर लिंगे आणि राजन दीक्षित आणि सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी लिंगे व दीक्षित यांच्या तोंडाला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.

obs-vs-maratha 1

शंकरराव लिंगे महासंघाच्या लेटरपॅडवर निवेदन घेऊन समितीला भेटण्यासाठी आले होते. मात्र सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. प्रकरण हातघाईवर आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. शंकरराव लिंगे त्यांचे कपडेही संतप्त कार्यकर्त्यांनी फाडले. पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना वाहनातून पोलीस स्टेशनला रवाना केले.

 

You might also like
Comments
Loading...