आठवड्याभरात रेल्वे अपघातात ६६ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये रेल्वे अपघातात गेल्या १५ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला. तर ६७ जण जखमी झाले आहेत. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांच्या आकडेवारीमधून हा आढावा घेण्यात आला आहे. मुंबईतील रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील वेगवेगळ्या स्थानकांवर या घटना घडल्या असून दरवाज्यावर उभे राहणे, टपावर बसणे यांसारख्या प्रकारांमुळे अधिकतर जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

You might also like
Comments
Loading...