औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे कितीतरी महिला बेरोजगार झाल्या, तसेच एकल (विधवा) महिलांना देखील झळ लागली आहे. महिलांविषयक अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांनी केले आहे.
महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा बसावा, कायद असून उपयोग नाही, तर नीट अंमलबजावणी व्हावी, अशी मनोकामना व्यक्त करत बाप्पाकडे रेणुका यांनी साकडे घातले. राज्यात महिला अत्याचारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतेच साकिनाका येथे घडलेली घटना सर्वांचे मन हेलावून टाकले आहे. कायदे असून उपयोग नाही, तर कठोर शिक्षा व अंमलबजावणी झाली पाहिजे. दिवसेंदिवस महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना ऐकण्यात येत आहेत. या विषयी चिंता व्यक्त करत सर्वच स्तरातून कडक नियम पाळले जावे, तसेच कायद्यांची प्रॉपर अंमलबजावणी व्हावी, असे ही मत सामाजिक कार्यकर्त्या कड यांनी व्यक्त केले.
त्या समाजातील अनेक प्रश्नांसाठी तळमळीने कार्यरत असतात. विशेषत: कोरोनामुळे एकल (विधवा)महिलांच्या समस्या व उपाययोजना, शाळा बाह्य मुलींचे शिक्षण, जेंडर गॅप, बालविवाह, महिलांचा ऑनलाईन छळ-उपाययोजना, याबद्दल अनेक परिसंवाद आणि चर्चेच्या माध्यमाने कार्य करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. रेणुका कड लिखित ‘सोशल मुव्हमेंट ऑफ इंडिया आफ्टर ग्लोबलायझेशन’ हे पुस्तक नुकताच प्रकाशित ही झाला आहे. त्यांना वुमन पॉवर सुमित अवार्ड २०२१ यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच रेणुका कड यांना ‘महाराष्ट्र देशा’ च्या कार्यालयात गणेश आरतीस आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली असून यावेळी त्यांनी बऱ्याच विषयावर चर्चाही केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीचा धडाका सुरूच; आता ‘या’ काँग्रेस नेत्याला बजावला समन्स
- राज्यातील सरकार स्थिर, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
- ‘मेकिंग दि तालिबान ग्रेट अगेन’; अमेरिकेत बायडेन यांचे होर्डिंग्स
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले ‘हे’ सूचक वक्तव्य महत्वाचे-जयंत पाटील