केईएम रुग्णालयाने गाठला असंवेदनशीलतेचा कळस

मृतांच्या कपाळावर पेनाने टाकले आकडे

मुंबई : केईएम रुग्णालयाने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. शासन आणि प्रशासनाच्या मुर्दाड कारभाराने एल्फिन्स्टन-परळ पुलावर २२ मुंबईकारांचा जीव घेतल्यानंतर आता केईएम रुग्णालयाने मृतांच्या माथ्यावर पेननं नंबर टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने या दुर्घटनेचं खापर पावसावर फोडले आहे. त्यामुळे खरच मुंबईकरणाचा जीव एवढा स्वस्त झालाय असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

दरम्यान, केईएम रुग्णालयाच्या या चीड येणाऱ्या प्रकरणानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नैतिक जबाबदारी म्हणून पोलीस आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.