fbpx

गंगा आली होsss अंगणी… १५ वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनेचे अखेर उद्घाटन

ajay deshpande

बीड – राज्यात बऱ्याच ठिकाणी सध्या हळूहळू पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी तर पाण्यासाठी नागरिकांना कित्येक किलोमीटर जावं लागत आहे. मात्र दुष्काळ हा फक्त निसर्गाचा कोप नसतो तर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी देखील बऱ्याच गावांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अर्धपिपंरी तालुका गेवराई जिल्हा बीड येथे देखील अशीच काहीशी परिस्थिती होती.

गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नळ योजना रखडल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. अनेक महिला यासंदर्भातील तक्रारी घेऊन नेतेमंडळींकडे जात असत मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसे. ही अडचण लक्षात घेऊन गावच्या विद्यमान सरपंच केशरबाई साळवे यांच्या पुढाकारातून गावातील नळ योजनेचं काम हाती घेण्यात आले .आणि नुसते काम हाती घेऊन त्या थांबल्या नाहीत तर हे काम तडीस देखील नेले. तब्बल १५ वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनेचे उद्घाटन शुक्रवारी गावचे प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र देशपांडे यांच्या हस्ते पार पडले. आहे. या योजनेतून गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय होणार असून, महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असल्यानं या योजनेचे ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग (ग्रामपंचायत स्थर) निधीतून या योजनेचे काम होणार आहे. या नळयोजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून, या योजनेतंर्गत पाइपलाइनची सोय उपलब्ध करून गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचं यावेळी बोलताना सरपंच केशरबाई साळवे यांनी सांगितलं.या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच गीता शेलुटे, सामाजिक कार्यकर्ते, राम गाडे,पांडुरंग वेदपाठक, दादासाहेब रुपनर, अशोक डोंगरे, जयराम हापटे, राघू इंगावले, श्रीराम गोरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती