दरडग्रस्त तळीये गावाचे तात्पुरते स्थलांतरण, विजय वडेट्टीवारांची माहिती

विजय वडेट्टीवार

मुंबई : रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला होता, अनेकांचं सांत्वन केलं होते. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

त्यावर, म्हाडा तळीये गावाचे पुनर्वसन करणार अशी माहिती, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली होते. आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली की, तळीये गावाचे तात्पुरते स्थलांतरण करण्यात येत आहे. त्यात पोस्टमध्ये ते असे म्हणले, दरडग्रस्त तळीये गावाचे ‘तळीये खालची वाडी’ जवळ तात्पुरते स्थलांतरण करण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबासाठी एक याप्रमाणे एकूण 24 कंटेनर हाऊसची व्यवस्था करण्यात आली आहे. एका कंटेनर हाऊस चे आकारमान 20×10×10 फूट असे आहे.’ अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली.

दरम्यान, महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली होती.

महत्त्वाच्या बातम्या