जाणून घ्या भेंडी पिकाची पूर्वमशागत व लागवड

टीम महाराष्ट्र देशा : भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे. भेंडीच्या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रामध्ये भेंडीखाली 8190 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.भेंडीचे पिक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी.

भेंडीचे पिक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्हाळी हंगामात पिक चांगले येते. पिकास 20 ते 40 सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पिक चांगले येते. उन्हाळयात भाज्यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.

Loading...

पुसा सावनी सीलेक्शन 2-2 फूले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका या सुधारीत जाती लागवडीस योग्य आहेत. खरीप हंगामात हेक्टरी 8 किलो आणि उन्हाळयात 10 किलो बियाणे पुरेसे होते. 1 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थायरम चोळावे.

जमिनीचे मशागत एक नांगरट व दोन कुळवण्या करुन जमिन भुसभूशित करावी व हेक्टरी 50 गाडया शेणखत मिसळून तिसरी कोळवणी करावी. पेरणीसाठी खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर 60 सेमी ठेवावे. आणि उन्हाळयात 45 सेमी ठेवावे. एक ओळीतील दोन झाडांत 30 सेमी अंतर राहील अशा बेताने बी टोकावे प्रत्येक ठिकाणी दोन बियांणी टोकणी करावी. उन्हाळयात स-या पाडून वरंब्याच्या पोटाशी बी टोकावे. शेतात ओलवणी करुन वाफसा आल्यानंतर बी पेरावे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा