सरकारमध्ये काम करत असताना प्रचार व प्रसार,माहिती देणे गरजेचे असते; राष्ट्रवादीची सारवासारव

अजित पवार

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात कोरोना महामारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे.अशातच सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

या आदेशात अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल.याशिवाय, व्हॉटसएप बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही या कंपनीवर असेल. अजित पवार यांचे सचिव आणि सामान्य माहिती व जनसंपर्क विभागाशी बोलणी झाल्यानंतर या नव्या कंपनीकडे सर्व कारभार दिला जाईल.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून राजकारण तापू लागले असून राष्ट्रवादीने आता आरोप करणाऱ्यांना मंत्री नवाब मलिक यांनी खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार यांच्या खात्याच्या प्रचार व प्रसारासाठी जो खर्च होणार आहे त्याकडे जे बोट दाखवत आहेत त्यांनी स्वतः सत्ता असताना किती खर्च केला याकडे लक्ष द्यावा असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. केंद्रसरकार व भाजपशासित सरकारे प्रचार व प्रसारासाठी वारेमाप खर्च उधळपट्टी करतेय त्या तुलनेत जास्त नाही हे विरोधकांना कळलं पाहिजे अशा शब्दात नवाब मलिक यांनी सुनावले आहे.

अजित पवार यांच्या खात्याच्या प्रचार व प्रसारावर ६ कोटी रुपये खर्च होत आहेत असा आरोप होत असून त्यावर नवाब मलिक यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सरकारमध्ये काम करत असताना प्रचार व प्रसार, माहिती देणे गरजेचे असते पण ६ कोटी रुपये खर्चावर जे लोक बोट ठेवत आहेत त्यांनी त्यांच्या सरकारमधील मुख्यमंत्री व प्रत्येक मंत्र्यांवर किती पैसे खर्च केले यावर लक्ष द्यायला हवे असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP