अमित शहांचा सुरक्षा खर्च जाहीर करण्यास माहिती आयोगाचा नकार

amit shah

टीम महाराष्ट्र देशा : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च ही सुरक्षा व व्यक्तिगत माहितीशी संबंधित बाब असून त्याची माहिती देता येणार नाही असे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे.

Loading...

कुठल्याही व्यक्तीच्या संबंधातील माहितीने जर त्या व्यक्तीचा जीव धोक्यात येणार असेल तर ती माहिती देण्यास माहिती अधिकार कलम ८ (१) जी अन्वये सूट आहे असे स्पष्ट करत गृहमंत्रालयाने माहिती देण्यास नकार दिला होता. माहिती अधिकार कायदा कलम १ (जे) अन्वये व्यक्तिगततेशी संबंधित व सार्वजनिक बाबींशी निगडित नसलेली माहिती देता येत नाही असेही सांगण्यात आले.

दरम्यान, आयोगाने याचिकाकर्त्यांने केलेले अपील फेटाळले असून त्यात असे म्हटले होते की, अधिकारी व खासगी व्यक्ती यांच्या सुरक्षेसाठी नेमके कोणते नियम आहेत ते सांगण्यात यावे. दीपक जुनेजा यांनी ५ जुलै २०१४ रोजी याचिका दाखल केली होती त्यावेळी शहा हे राज्यसभेचे सदस्य नव्हते.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेटLoading…


Loading…

Loading...