भीमा कोरेगावमध्ये कोणी हिंसाचार घडवला, हे मुख्यमंत्र्यांना माहिती: प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar

पुणे : भीमा कोरेगाव च्या माध्यमातून सामाजिक वातावरण चांगलच तापल आहे तसेच अनेक हिंदुत्ववादी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी झाली असून भारिप नेते प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, भीमा कोरेगावमध्ये कोणी हिंसाचार घडवला, हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. त्यामुळे भाजप ची कोंडी झाली आहे. भीमा कोरेगावच्या २००व्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनावरूनच वाद निर्माण झाला होता. नंतर या प्रकरणाला हिंसक वळण लागले. या सर्व परिस्थितीस विरोधकांनी फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे. तसेच हिंदुत्ववादी नेत्यांनी पूर्वनियोजितपणे हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप विरोधी नेत्यांनी केला आहे. असा  प्रचार होणे भाजपसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी हिंसाचारास जबाबदार धरलेल्या भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे या हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याने भाजपची अधिकच पंचाईत झाली आहे.