हिंगोली जिल्ह्यात संसर्ग वाढला; मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार कोविड केंद्र

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले जिल्ह्यातील कोविड केअर सेंट २३ फेब्रुवारी (मंगळवार) पासून पुन्हा सुरू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यात डिंसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कामी झाला होता. त्यामुळे शहरासह तालुक्यांमध्ये असलेले कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. तेव्हापासून शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा देऊन त्यांच ठिकाणी कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढून लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने बंद असलेले जिल्ह्यात कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आसून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरोग्य विभागातील आधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्याचप्रमाणे खबरदारीचा उपया म्हणून कडट उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

महत्त्वाच्या बातम्या