संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अपात्र प्रकरण; निमसे समितीसमोर अधिकारीच गैरहजर!

dr. bamu

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील आणि विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या नियुक्त्या अपाञ आहेत, असा गंभीर आरोप डॉ. शंकर अंभोरे यांनी केला आहे. मंगळवारी डॉ. निमसे समितीने तक्रारदार व संबंधित अधिकार्‍यांना त्यांचे म्हणणे मांडण्यालाठी बोलवले होते. मात्र फक्त तक्रारदार उपस्थित होते. यात संबंधित अधिकार्‍यांनी समितीसमोर येण्याचे टाळले.

डॉ. शंकर अंभोरे, संजय निंबाळकर, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजाभाऊ करपे, नागराज गायकवाड यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील आणि विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह विविध संवैधानिक अधिकार्‍यांच्या नियुक्तीसंदर्भात काही आक्षेप घेतले होते. या तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या समितीने तक्रारदारांचे मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी म्हणणे ऐकून घेतले.

यात डॉ. शंकर अंभोरे यांनी डॉ. योगेश पाटील आणि डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या नियुक्‍तीबाबत विविध आक्षेप घेतले आहे. डॉ. शंकर अंभोरे यांनी हे दोन्ही संवैधानिक अधिकारी कागदोपञी अपाञ असल्याचे म्हटले आहे. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी या राजकीय भांडवल करून कुलसचिव पदावर बसल्या आहेत. तर डॉ. योगेश पाटील हे देखील युजीसीच्या नियमांत न बसणारे अधिकारी आहे. त्यामुळे या दोन्ही संवैधानिक अधिकार्‍यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्या, अशी मागणी डॉ. सर्जेराव निमसे यांच्या समितीकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या