मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा (INDW vs SLW) ३४ धावांनी पराभव केला. भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना बांधून ठेवत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. या विजयानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आनंद व्यक्त केला आहे.
हरमनप्रीत म्हणाली, ”मला वाटते याचे श्रेय सर्व खेळाडूंना द्यायला हवे कारण त्यांनी आत्मविश्वास दाखवला आणि जेमिमाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती अप्रतिम होती. एक संघ म्हणून, आम्हाला नेहमीच पहिली सहा षटके वापरायची आहेत आणि त्याशिवाय सर्व काही आमच्या योजनेनुसार झाले. आम्ही येथे आमच्या वेळेचा आनंद घेत आहोत आणि लोक येतात आणि आम्हाला खेळतात पाहतात, या गोष्टीनेच आनंद झाला आहे.”
🇮🇳💥 THUMPING VICTORY! The girls have done it again as we defend the total and defeat the Lankans for the sixth time at their home.
👏 Take a bow, girls!
📸 Getty • #INDWvSLW #SLWvINDW #harmanpreetkaur #TeamIndia #BharatArmy pic.twitter.com/vseG9hAXn7
— The Bharat Army (@thebharatarmy) June 23, 2022
प्रथम फलंदाजी करताना भारताने १७ धावांवर स्मृती मानधनाची विकेट गमावली. यानंतर त्याच स्कोअरवर भारताला दुसरा धक्का बसला. कर्णधार हरमनप्रीतही २२ धावा करून बाद झाली. सलामीवीर शफाली वर्माने ३१ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमिमाने ३६ धावांची खेळी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.
भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला २७ धावांवर तीन धक्के देत शानदार सुरुवात केली होती. राधा यादवने सातव्या षटकात दोन गडी बाद करत यजमानांना जोरदार धक्का दिला. कविशा दिलहरीने एकटीने झुंज दिली, पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. कविशाने ४७ धावांची खेळी खेळली. भारतातर्फे पूजा वस्त्राकरने चार षटकांत केवळ १३ धावा देऊन एक बळी घेतला. राधाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –