IndvsEnd Test Series: कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; IPLचा स्टार ऋषभ पंतला संधी

नवी दिल्ली – टी- 20 आणि एकदिवसीय सामन्यांनंतर टीम इंडिया इंग्लंडविरोधात पाच कसोटी सामने खेळायला सज्ज झाली आहे. 1 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे. संघात ऋषभ पंत आणि कुलदीप यादवला खेळण्याची संधी मिळणार असून भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे.

१८ खेळाडूंच्या या संघातून अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा याला वगळण्यात आले आहे. कसोटीतील त्याची कारकीर्द तितकीशी प्रभावी नसल्याने त्याच्या जागी करूण नायर याला पसंती देण्यात आली आहे. तसेच, मराठमोळ्या शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. तसेच, चायनामॅन कुलदीप यादव यालाही समाविष्ट करण्यात आले आहे.

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहणे (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करून नायर दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर

विजयाचं श्रेय धोनीला – शार्दूल ठाकूर

भारत व श्रीलंका कसोटी: भारतीय फलंदाजांची हुकूमत

एचपीचा ‘एक्स ३६०’ लॅपटॉप भारतात दाखल

You might also like
Comments
Loading...