पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, एमआयडीसी सुरू राहणार ; मंगळवारपासून शहर राहणार कडक बंद

lockdown

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधितांची संख्या हि आटोक्याबाहेर असून पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून 13 जुलै (मध्यरात्री) ते 23 जुलै दरम्यान हे लॉकडाउन लागू होणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याच्या हेतूने हे लॉकडाउन जाहीर करण्यात येत आहे, हे अगोदरच प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दरम्यानची नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहिर केली आहे.

नव्या नियमावलीनुसार दूध विक्री, औषधांची दुकाने, रुग्णालये आदींना वगळण्यात आले आहे, तर आठवडी बाजार, फेरीवाले, बांधकामाची कामे, मंगल कार्यालये, किराणा दुकान, किरकोळ विक्रेते, सर्व व्यवसाय, भाजी मंडई, धार्मिक स्थळे, सर्व खासगी कार्यालये पूर्ण बंद राहणार आहेत. यामध्ये मात्र आयटी क्षेत्रातील कंपन्यांना 15 टक्के कामगार ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. आणि बांधकाम साईट्स येथील कामगारांची तिथेच राहण्याची सोय केल्यास बांधकाम सुरू राहणार असल्याच नियमावलीत म्हटलं आहे. शहरातील खासगी जागेतील उद्योग आणि एमआयडिसी सशर्त सुरू ठेवण्याची परवानगी आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना मास्क आवश्यक. मास्क चा वापर करणे अनिवार्य आहे. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल. फिजिकल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू, इत्यादींच्या सेवनास मनाई आहे. तसेच उद्योगांनाही सशर्त परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करावे.’’

६५ वर्षावरील सर्व व्यक्ति, अति जोखमीचे आजार, असलेल्या व्यक्ति, गरोदर महिला, वय वर्षे १० पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसेच इतर कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घरा बाहेर पडता येणार नाही.

काय राहणार बंद :

१) शाळा, महाविद्यालय, शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहतील. सार्वजनीक व खाजगी प्रवासी वाहने- दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पुर्व परवानगी प्राम वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे येणे करीता व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर होइल.

२) सार्वजनिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा, उद्याने, बगीचे हे बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (वंदे भारत योजने अंतर्गत कोविड-१९ करीता वापरात असलेले वगळुन), रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट बंद राहतील.

३) केश कर्तनालय, सलुन, स्पॉ, ब्युटी पार्लर आणि मंडई, आडत भाजी मार्केट, फळे विक्रेते, आठवडी बाजार, फेरीवाले हे सर्व ठिकाणे पाच दिवस बंद राहणार असून त्यानंतरच्या कालखंडात शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांचे विक्री करणारे अधिकृत फेरीवाले यांचे मार्फत करण्यात येणारी विक्री सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहतील.

४) चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह संपूर्णत: बंद राहतील. सामाजीक, राजकीय मनोरंजन, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सभा, धार्मिक स्थळे बंद राहतील.

काय राहणार सुरु :

१) दूध वितरण सेवा सुरू, खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमीत वेळेनूसार सुरु राहतील. मेडीकल दुकाने तसेच आॅनलाईन औषध वितरण सेवा संपुर्ण कालावधी करीता सुरु राहतील.

२) स्वराज्य संस्थेची कार्यालये तसेच सर्व खाजगी कार्यालये महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र ४ नुसार १० टक्के कर्मचारी वर्गासह सुरु राहतील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी ६ ते ९ या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील. आणि पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहतील व ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा करतील.

३) बँकेच्या इतर ग्राहकसेवा जसे आॅनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील. संपुर्ण पिंपरी चिंचवड शहराचे हददीतील न्यालालये सुरू, मेट्रो, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महत्वाचे प्रकल्प, स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प आदींची कामे सुरू.

४) शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालु राहतील. सर्व वैद्यकीय व्यावसायीक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अँम्बुलन्स यांना शहराअंतर्गत वाहतूकीसाठी परवानगी राहिल.

आता हिम्मत असेल विनामास्क बाहेर पडून दाखवा, होणार ‘इतका’ दंड

जयने केली विरूसाठी प्रार्थना

बंद शाळांना आली भरमसाट वीजबिलं, महावितरणच्या कारभारावर शिवसेनेचे ताशेरे