मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीजबिलात सूट द्यावी; उद्योजक संघटनांची मागणी

औरंगाबाद : मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीजबिलात सूट द्यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शहरातील सीएमआयए उद्योजक संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सचिव सतीश लोणीकर, गौतम नंदावत, आशिष गर्दे, नितीन काबरा, देवगिरी क्लस्टरचे संचालक सुरेश तोडकर, विनायक देवळाणकर यांची उपस्थिती होती.

उद्योजकांना वीज बिलात ७५ पैसे प्रति युनिटप्रमाणे मिळणाऱ्या सबसिडी कार्यप्रणालीत सुसूत्रता आणावी आणि वीज बिल आकारातील पॉवर सबसिडी योजनेच्या अंदाजपत्रकात १८०० कोटी वाढ करावी, अशी मागणी यावेळी सीएमआयएच्या उद्योजक संघटनेच्यावतिने करण्यात आली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली. शेंद्र्यातील देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरला एमअायडीसीतर्फे २ कोटी रुपयांचे अनुदान मिळावे, तसेच आयपीएस योजनेअंतर्गत गुंतवणुकीचा कालावधी एका वर्षासाठी वाढवण्यात यावा, अशा मागण्याची यावेळी शिष्टमंडळाने देसाई यांच्याकडे केल्या.

दरम्यान, सुभाष देसाई यांनी देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरला एका कोटी ३७ लाखांचे शासनाचे अनुदान देण्याबाबत मान्यता दिली. तसेच पॉवर सबसिडी या योजनेच्या बजेटमध्ये वाढ करण्याचे मान्य केले. जीएसटीअंतर्गत उद्योग घटकांसाठी अर्ज प्राप्तीनंतर ९५% पर्यंत लाभांश देण्यात येईल, असे अश्ववासनही यावेळी सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळाला दिले.

महत्त्वाच्या बातम्या