घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही

अहमदनगर : ‘ मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही.’ असं स्पष्टीकरण कीर्तनकार इंदुरीकर यांनी दिलं आहे. कीर्तनकार इंदुरीकर यांनी बुधवारी (ता.19) पीसीपीएनडीटी कायद्यानुसार मिळालेल्या नोटीसला शेवटच्या दिवशी उत्तर दिलं. मात्र, या माफीनाम्यात काय स्पष्टीकरण दिले आहे हे माध्यमांपासून लपवण्यात आले होते. अखेर इंदुरीकरांनी आरोग्य विभागाला दिलेलं उत्तर समोर आलं आहे.

यात ‘मी असं वाक्य बोललोच नाही आणि मी असं कीर्तन केलंच नाही,’ असे म्हणत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे. इंदुरीकरांनी अचानक असे आरोप फेटाळून लावल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकार काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...

इंदुरीकर महाराज यांनी नोटीसला उत्तर देताना म्हटलं, “मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तनच केलं नाही. मी समाज प्रबोधन करत असल्यानं मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही.”

याहून विशेष बाब म्हणजे एका जाहीर कीर्तनात इंदुरीकर महाराज यांनी ‘सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच, ज्या युट्युब चॅनेलने हा व्हिडीओ अपलोड केला होता, त्या चॅनेलने वादानंतर संबंधित व्हिडीओदेखील डिलीट केला आहे.

त्यानंतर आता इंदुरीकर महाराज यांनी नोटीसला उत्तर देताना आपण ते वाक्यच बोललो नसल्याचा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अहमदनगर आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांसोबतच या वादग्रस्त वाक्व्याची संबंधित वृत्तांकन करणाऱ्या वर्तमानपत्रालाही नोटीस दिली होती. मात्र यावर संबंधित वृत्तपत्राने कोणतेही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे ते काय उत्तर देतात आणि काय पुरावे देतात हेही पाहावं लागणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....