इंदुरीकर चांगला उपदेश करतात ; पण त्यांच्याकडून झालेली चूक दुरुस्त करण्याचे काम सरकार करेल

टीम महाराष्ट्र देशा : प्रवचनकार ,कीर्तनकार निवृत्तीनाथ देशमुख अर्थात इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून चांगले उपदेश देतात. त्यांच्याबाबत सरकारची भूमिका वाईट नाही. पण त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्याचं काम सरकार करेल, असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलं आहे.

बच्चू कडू यांनी उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी इंदोरीकर महाराजांच्या सम-विषम तिथीबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. मग बच्चू कडू असो किंवा दुसरं कुणी असूद्या. महाराजांच्या दोन तासांच्या कीर्तनामध्ये एखादा शब्द चुकीचा निघाला असेल आणि कुणी त्याची तक्रार करत असेल तर हा विषय गंभीर आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

Loading...

बच्चू कडू पुढे म्हणाले की ‘इंदोरीकर महाराजांचा त्या वक्तव्यामागे उद्देश काय होता? हे तपासणंदेखील गरजेचं आहे. नोटीस देण्याचा अर्थ गुन्हा दाखल करणं असा होत नाही. कायदेशीर कारवाई होईल. इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून चांगले उपदेश देतात. त्याबद्दल सरकारची भूमिका वाईट नाही. पण त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्याचं काम सरकार करेल.असं ते म्हणाले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती