इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे

टीम महाराष्ट्र देशा: इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यावर विविध स्तरातून टीका होत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील इंदुरीकर यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. अहमदनगर येथील श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडलं. तसंच पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपरे, पोपटराव पवार आणि जहीर खान यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी इंदुरीकर महाराज यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली.

पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धा पसरवली जाणं दुर्दैवी असून किर्तनकारांबद्दल माझ्या मनात मान सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा नाही. यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलोय. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे दुर्दैवी आहे, असं परखड भाष्य बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय.

Loading...

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. ‘आमच्या विरोधकांनी आमच्यावर दिलदारपणे टीका करावी. विश्वासाने लोकांनी आम्हाला निवडून दिलंय. पाच वर्षे सरकार टिकवणे आमची जबाबदारी आहे. निवडणूक जर झाली तर जनतेचा पैसा खर्च होणार, केंद्र सरकार आज राज्याला निधी देत नाही. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आज राज्य संकटात सापडले आहे’, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिलं.तसंच, मंत्रालय आपल्या हक्काचं आहे असं आज लोकांना वाटू लागलंय. हे मायबाप सरकार नाही तर राज्यातील जनता मायबाप आहे, असंही सुळे यांनी सांगितलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....