शिवाजी विद्यापीठात होणारा इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम अखेर रद्द

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात होणारा कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा आयोजित कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. कोल्हापुरातील पुरोगामी विचारांच्या महिला संघटनांनी आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या कार्यक्रमाला विरोध करत विद्यापीठात होणारा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता अखेर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

तर वेळेत पोहोचणं शक्य नसल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे स्पष्टीकरण आयोजकांनी दिले आहे. तसेच कोणत्याही संघटनेच्या दबावाला बळी न पडता हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Loading...

स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. या बेताल वक्तव्याने इंदुरीकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात इंदुरीकर यांचा कार्यक्रम होणार होता. मात्र कोल्हापुरातील पुरोगामी विचारांच्या महिला संघटनांनी विद्यापिठात होणारा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आहे. त्यामुळे महिलांबाबत बेताल बोलणाऱ्या इंदुरीकर यांचा कार्यक्रम या विद्यापीठात होऊ नये, अशी भूमिका या महिला संघटनांनी घेतली असून इंदुरीकर यांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे.

तर कोल्हापूर युवा सेनेनं या संघटना विरोध करत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांना त्या’ व्हिडिओबाबतचे पुरावे दिले आहेत.मात्र पुरावे देऊनही १५ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास इंदोरीकरांसह जिल्हा शल्यचिकित्सकांविरुद्ध फिर्याद दाखल करू, असा इशारा अंनिसच्या राज्य कार्यवाह ऍड. रंजना गवांदे यांनी आज दिला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात