स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी

blank

टीम महाराष्ट्र देशा : स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात. असे बेताल विधान कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी एका कीर्तनादरम्यान केले होते.

मात्र त्यांच्या या विधानाने इंदुरीकर यांच्यावर गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्र देशाशी बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी इंदुरीकर महाराज यांनी नैतिक जबाबदारीतून माफी मागावी, असे म्हंटले आहे. ‘ स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी महिलांबद्दल बेताल बोलणे शोभात नाही. ते त्यांच्या प्रत्येक कीर्तनात महिलांना टार्गेट करत असतात. लोकांच्या टाळ्या मिळविण्यासाठी आणि लोकांमध्ये हशा पिकविण्यासाठी प्रत्येक वेळी महिला- मुलीवर बोलणे हे त्यांच्यासारख्या प्रबोधनकारला शोभत नाही.

सलगर पुढे म्हणाल्या, ‘तुम्हाला बोलायचेच असेल तर महिला आणि पुरुषांवर सारख्याच कमेंट करा. महिलांवर अश्लील कमेंट करून ते फक्त कुप्रसिधी मिळवत आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारीतून माफी मागावी.’ असेही सलगर यांनी यावेळी म्हंटले आहे.

दरम्यान, अहमदनगरच्या पीसीपीएनटीडी च्या सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. पुरावे कोणी सादर केल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी प्रदीप मुरंबीकर दिली आहे.