…अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा

मुंबई : स्त्री संग समतिथीला केला तर मुलगा आणि विषमतिथीला केला तर मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तसेच इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा या आग्रही मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अहमदनगरमध्ये जाऊन पोलीस अधिक्षकांना निवेदन दिलं होतं. इंदोरीकर महाराज नेहमी कीर्तनातून महिलांचा अपमान करतात असा आरोप त्यांनी केला होता. त्याचसोबत ४ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा दिला होता. मात्र तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यावरुन मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांना प्रतिइशारा दिला होता.

Loading...

मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी इंदोरीकर महाराजांचा महिलांवरील जुना व्हिडिओ व्हायरल करुन तृप्ती देसाईंवर पुन्हा निशाणा साधला आहे. या व्हिडिओत महाराज म्हणतात की, १ हजार मुलांमध्ये ९३५ मुली असा जन्मदर आहे. ६५ मुली हजाराला कमी आहे, याला एकमेव कारण सोनोग्राफी आहे, मुलगी व्हायलाच पाहिजे, जगातील सर्वात मोठं पाप स्त्रीभ्रूण हत्या आहे. काही महिला मुलगी झाल्यावर तोंड पाडतात पण का? ,’ असे इंदोरीकर महाराज या व्हिडिओत सागंत आहेत.

दरम्यान, पुढे या व्हिडिओत इंदोरीकर महाराज मुलींचे महत्त्व समाजाला कीर्तनातून सांगत असल्याचं दिसतं. ते पुढे म्हणतात, तुम्ही पण मुलगी होता ना, तुमच्या बापाने जमिनी विकून का होईना तुम्हाला सुखी केलं ना, मग मुलगी व्हायलाच पाहिजे. लग्न साधं केलं तरी पोरं होतात, पैशाचं सोंग आणता येत नाही, शेतकऱ्याने जोडधंदा करा, पण मुलगी शिकवा, मुलींसाठी अनेक योजना सरकार देतं त्याचा फायदा घ्या असं महाराज सांगताना दिसतात.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका