इंदुरीकर महाराजांचा बाळासाहेब थोरातांना पाठींबा

blank

टीम महाराष्ट्र देशा : विनोदी कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. तसेच इंदुरीकर महाराज हे भाजपकडून तिकीट घेवून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात संगमनेर मतदारसंघातून लढवणार असल्याची अफवा उठली होती. यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंदुरीकर महाराजांचं यांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा हक्क आहे. त्यावर मी बोलणार नाही. मात्र त्यांनी पत्रक काढून राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उलट त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी मला पाठिंबाच दिला आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

दरम्यान इंदुरीकर महाराज यांनी देखील राजकारणात येणार असल्याच वृत्त फेटाळल आहे. त्यांनी पत्रक काढून वृत्ताचे खंडन केले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आली होती. त्यावेळी व्यासपीठावर इंदुरीकर महाराज उपस्थित होते. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं. यावर इंदुरीकर महाराजांनी खाजगी काम असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.