‘महाराष्ट्राच्या संत परंपरेत इंदुरीकरांचं कीर्तन बसत नाही’

पुणे : स्त्री संग समतिथीला केला तर मुलगा आणि विषमतिथीला केला तर मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच माध्यमांमध्ये सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे महाराज व्यथित झाल्याचे पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यात इंदुरीकरांचं कीर्तन बसत नाही. त्याचबरोबर त्यांचे विनोदही कमी दर्जाचे असतात,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

Loading...

तसेच ‘मी गेली ५०-५५ वर्षे कीर्तन ऐकतो आहे. त्यामधे मामासाहेब दांडेकर व त्यांच्याही आधीच्या किर्तनकारांची किर्तनं ऐकली आहेत. पण अशाप्रकारचे विनोद पूर्वी कोणाच्याही किर्तनामध्ये नव्हते. ही लाट अलिकडेच आली आहे,’ असे देखील मोरे यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, ‘इंदोरीकर महाराजांची भाषणं जनप्रबोधनासाठी असतात, एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका,’ असा सल्ला पाटलांनी माध्यमांना दिला.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘इंदोरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण इंदोरीकरांच्या पाठीशी आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. तसेच ‘मी इंदोरीकर महाराजांचं समर्थन करत नाही. त्यांनी महिलांबद्दल ते विधान करायला नको होतं. दिवसरात्र किर्तनं करून तो माणूस समाज प्रबोधनाचं काम करतोय, ‘त्या’ एका वक्तव्यावर त्या माणसाची सारी तपश्चर्या घालवू नका,’ असे पाटील म्हणाले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका