मी आताच मुख्यमंत्री आहे,मला उभं राहून काय करायचं?

टीम महाराष्ट्र देशा : भाजपची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यात आली होती. या यात्रेच्या संगमनेर येथील सभेत किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात इंदुरीकर महाराज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आली होती.

संगमनेरमधून आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा इंदुरीकर महाराजांनी दिली आहे. पुरग्रस्तांना मदतनिधी देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर गेलो तर माध्यमांनी विनाकारण वावड्या उठवल्याचं इंदुरीकर म्हणाले आहेत. मी आताच मुख्यमंत्री आहे मला उभं राहून काय करायचं? असा टोलाही त्यांनी लगावला आहे. संगमनेर गावातील कसारे गावच्या किर्तनात त्यांनी हा खुलासा केला आहे.

इंदुरीकर महाराजांचं यांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा हक्क आहे. त्यावर मी बोलणार नाही. मात्र त्यांनी पत्रक काढून राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उलट त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी मला पाठिंबाच दिला आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या