इंदुरीकर महाराजांची शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल; शिक्षकांबाबत काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

मुंबई : ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये शिक्षक वर्गात येऊन वेळ कसा वाया घालवतात? हे सांगत त्यांनी शिक्षकांवर टीका केली आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज आता शिक्षकांच्या बाबातीत उडवलेल्या खिल्लीमुळे पुन्हा एकदा वादात आले आहे.

शिक्षक ३५ मिनिटांच्या तासिकेत पाच मिनिटं तर शिक्षक वर्गात जाण्यासाठी घालवतात. त्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटं घालवतात. आदल्या दिवशी काय झालं ते सांगायला आणखी पाच मिनिटं घेतात. उरलेल्या वेळात उद्याच्या तासाला काय शिकणार हे सांगायलाही पाच मिनिटं घेतात. त्यानंतर काय मग तास संपला हे सांगायचीच वेळ येते. असं म्हणत शिक्षक त्यांना शिकवण्याची तासिका आटोपती घेतात असंही इंदुरीकर महाराज या क्लिपमध्ये सांगत आहेत.

Loading...

‘महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, प्रबोधनाची मोठी परंपरा लाभली आहे. ज्यामध्ये सकारात्मक टीका केली जाते. मात्र, इंदुरीकर महाराजांनी ज्याप्रकारे शिक्षकांची खिल्ली उडवली आहे, ती बघून अनेक प्रामाणिक शिक्षक व्यथित झाले आहेत. अगदी खालच्या पातळीला जाऊन केलेली ही टीका पूर्णपणे अनाठायी वाटते,’ असे महाराष्ट्र संयोजक भाऊसाहेब चासकर म्हणाले.

दरम्यान, ओझरमध्ये झालेल्या किर्तनात “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केल होतं. त्या पाठोपाठ आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन