‘इंदुरीकर महाराजांना टार्गेट केलं जातं आहे, आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत’

blank

नाशिक : प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी बसभाडे वसूल करणे ठाकरे सरकारला शोभते का ?

इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची 3 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले आहे. आज इंदुरीकर समर्थकांनी संगमनेर तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे. इंदुरीकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. जर इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यात आला नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे.

निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्‍यातील वारकरी संघटना व सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर न्यायालयात दाखल केलेली फिर्याद खोटी असून, ती त्वरित मागे घेण्याची मागणी अकोले तालुका वारकरी संघटनेने तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे केली.

‘मिशन बिगीन अगेन’ बाबत अधिसूचना जाहीर, जाणून घ्या काय आता नेमकी काय असणार बंधने

दरम्यान, आता आ. विनायक मेटे देखील इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ‘इंदुरीकर महाराज यांच्यावर खटला दाखल करणे चुकीचं आहे. काही चुकीच्या गोष्टी बाजूला ठेवायला पाहिजे. यापूर्वी अशी अनेकांनी विधान केली, बागेतील आंबे खाल्ली तर मुलं होतात बोललं आहे, त्यावेळी काही करत नाही. महाराजांना टार्गेट केलं जातं आहे. त्यांना बदनाम करण्यामागे षड्यंत्र रचलं जात आहे. त्याला सरकार बळी पडत आहे, आम्ही सगळे महाराजांच्या सोबत आहोत,’ अशी भूमिका मेटेंनी मांडली. tv9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.