इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले ‘खूप मोठे कीर्तनकार’ ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे ‘धर्म नष्ट’ करायला निघाले आहेत

blank

टीम महाराष्ट्र देशा: निवृत्तीनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले खूप मोठे प्रवचनकार,कीर्तनकार आहेत.त्यांच्या कीर्तनाला लाखभर लोकांची उपस्थिती असते.त्यांनी माडलेले मुद्दे हे मी स्वतः कैक वेळा ऐकले आहेत.त्याचबरोर इंदुरीकर महाराज जे बोलतात.त्याला संत वाड्मय ,पुराणे आणि संत वचन घेऊन बोलत असतात.त्यामुळे त्यांच्यावर केला जाणारा आरोप हा बिनबुडाचा असून त्यात काही तथ्य नाही असं मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरत बुवा यांनी महाराष्ट्र देशा सोबत बोलतांना व्यक्त केले आहे.

इंदुरीकर महाराजांनी यांनी धर्माच्या संवर्धनासाठी खूप केले आहे.त्यांना कुणीही शिकवायचा प्रयत्न करू नये. त्याच बरोबर तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे धर्म नष्ट करायला निघाले आहे.अशा लोकांना माध्यमांनी खूप महत्व देऊ नये असही भरत बुवा पुढे म्हणाले आहेत.

सोबतच इंदुरीकर महाराजांनी आता पर्यंत जे काही प्रबोधन केले,त्याचा विषय या देसाई आणि अंनिस वाल्यांनी कधीच लावून धरला नाही.आणि आत्ताच हे कसे बरं जागे झाले.इंदुरीकर महाराज जे बोलले त्याला सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या गुरुचरित्राच्या ओव्यांचा संदर्भ आहे.त्यामुळे त्यात त्यांनी स्वतःची मते घुसडली आहेत असही नाही त्यामुळे त्यांच्यावर केले जाणारे आरोप हे केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केले जात आहेत.त्यात अजिबात तथ्य नाही असंही भरत बुवा यांनी म्हटले आहे.