इंदुरीकर महाराजांनी ‘तरुण वर्गा’ला कीर्तनाची गोडी लावली ; फक्त ‘प्रसिद्धी’साठी टीका करू नका

टीम महाराष्ट्र देशा : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्तीनाथ देशमुख अर्थात इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका किर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत इंदुरीकर म्हणाले, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.

या सगळ्या प्रकरणावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अँड. मंदार जोशी यांनी महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया दिली आहे.जोशी म्हणालें की ‘इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चुकीचे आहे.हे प्रथमदर्शी जरी दिसत असले तरी त्यामागच्या भावना आपण समजून घेतल्या तर त्यांचा हेतू हा कुणालाही दुखावण्याचा नव्हता.आणि आपण हे सुद्धा विसरून चालणार नाही की अगदीच सोप्या भाषेत आणि विनोदी ढंगात समाजप्रबोधन करण्याचा महाराजांचा प्रयत्न असतो.सोबतच तरुण वर्गाला कीर्तनाची गोडी लावणारे महाराज आहेत. त्यामुळे फक्त सवंग बाजू प्रसिद्धीसाठी घेऊ नये .आणि उगाच काहीलोकांचा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे.

Loading...

श्रीमद भागवत पुराणाच्या १० व्या स्कंदात सांगितलं आहे की पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं. चौथ्या महिन्यात हस्ती येतात. पाचव्या महिन्यात त्वचा येते. सहाव्या महिन्यात बाळ फिरायला लागतं. ते जर उजव्या कुशीवर फिरलं तर मुलगा होतो आणि तो जर डाव्या कुशीवर फिरला तर मुलगी होते, असंही त्यांनी आपल्या किर्तनात म्हटलं होते.त्यातून पुरोगामी संघटनांकडून इंदुरीकर महाराजांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत