इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे

पुणे : समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून केलेल्या गर्भलिंग निदानाची जाहिरात आणि महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तत्काळ माफी मागण्याची मागणी केली होती.

मात्र, मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी इंदुरीकर महाराजांना समर्थन दिले आहे. ‘आपल्या समाजात काही विघ्नसंतुष्ट,विकृत लोक असतात असा त्रास देऊन माणूस मनातून आतून संपवण्याचा घाट असतो. तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही आपल्या सॊबत आहोत. समाजात तिढा निर्माण करणारी लोक समाजच स्वीकारत नाही. असे रुपाली पाटील- ठोंबरे यावेळी म्हणाल्या आहेत.

Loading...

तसेच संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे आणि ते दिसतंय. आपण जे दाखले दिले तर पुरव्यनिशी दिले त्यामुळे आपण मानसिक खच्ची होऊ नये आणि आपल्या कोणतेही कायदेशीर गरज लागल्यास अॅड. पाटील-ठोंबरे असोसिएटस विनामूल्य आपल्या सोबत आहे.माझ्या सारख्या असंख्य लेकी आपल्या सोबत आहे.काळजी नसावी. असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं