‘मीडियानं ३ मिनिटात महाराष्ट्रभर माझा बोंग्या केला’

टीम महाराष्ट्र देशा : विनोदी कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. तसेच इंदुरीकर महाराज हे भाजपकडून तिकीट घेवून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात संगमनेर मतदारसंघातून लढवणार असल्याची अफवा उठली होती.

त्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी देखील राजकारणात येणार असल्याच वृत्त फेटाळल आहे. त्यांनी पत्रक काढून वृत्ताचे खंडन केले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आली होती. त्यावेळी व्यासपीठावर इंदुरीकर महाराज उपस्थित होते. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं. यावर इंदुरीकर महाराजांनी खाजगी काम असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

यावर पुन्हा एकदा इंदुरीकर महाराजांनी भाष्य केले आहे. त्यांनी एका कीर्तनात पूरग्रस्तांना मदत करायला गेलो आणि मीडियाने तीन मिनिटात महाराष्ट्रभर बोंग्या केला असं विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाच्या चर्चेला मिडियाला जबाबदार धरले आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याच शैलीत त्यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, याविषयी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी इंदुरीकर महाराजांचं यांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा हक्क आहे. त्यावर मी बोलणार नाही. मात्र त्यांनी पत्रक काढून राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उलट त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी मला पाठिंबा दिला आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.